आधार कार्ड PDF म्हणजे काय?
आधार कार्ड हरवले असेल किंवा Physical आधार कार्ड
जवळ नसेल तर आधार कार्ड PDF (e-Aadhaar)
ऑनलाइन डाउनलोड करता येतो.
हा e-Aadhaar पूर्णपणे वैध असतो.
आधार कार्ड PDF डाउनलोड का आवश्यक आहे?
• ओळख पुरावा म्हणून
• बँक व सरकारी कामांसाठी
• KYC साठी
• आधार नंबरचा पुरावा म्हणून
आधार कार्ड PDF डाउनलोड करण्यासाठी काय लागते?
• आधार नंबर किंवा VID
• आधारला लिंक मोबाईल नंबर
• OTP
आधार कार्ड PDF ऑनलाइन कसं डाउनलोड करायचं?
1) https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्या
2) Download Aadhaar या पर्यायावर क्लिक करा
3) Aadhaar Number किंवा VID टाका
4) OTP Verify करा
5) आधार कार्ड PDF डाउनलोड करा
मोबाईलवर आधार कार्ड डाउनलोड करता येते का?
होय, UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून
मोबाईलवरही आधार कार्ड PDF डाउनलोड करता येतो.
आधार कार्ड PDF पासवर्ड काय असतो?
आधार कार्ड PDF उघडण्यासाठी पासवर्ड लागतो.
पासवर्ड = नावाची पहिली 4 अक्षरे (Capital) + जन्म वर्ष
उदा. नाव RAMA, जन्म वर्ष 1995 → RAMA1995
आधार कार्ड डाउनलोड होत नसेल तर काय करावे?
• मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का ते तपासा
• OTP योग्य टाका
• थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा
निष्कर्ष
आधार कार्ड PDF डाउनलोड करणे खूप सोपे आहे.
OTP असल्यास घरबसल्या e-Aadhaar मिळवता येतो.
टीप:
अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन हवे असल्यास
Contact Us पेजला भेट द्या.
0 टिप्पण्या