सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती
आता हार्ड डिस्क मध्ये खूप Advanced बदल झालेले आहेत. आजच्या आधुनिक हार्ड डिस्क मध्ये जास्त स्टोरेज, कमी किंमत, लहान आकार असे महत्त्वाचे बदल झालेले आहेत, परंतु या हार्ड डिस्क ची एक समस्या अजूनही सोडवण्यास यश आलेले नाही ती म्हणजे Read and Write Speed. Read and Write Speed कमी असल्यामुळे याचा परिणाम संगणकाच्या वेगावर पडतो.
या त्रुटी ला सोडवण्यासाठी एक नवीन स्टोरेज उपकरण बनवण्यात आलेले आहे, हेच ते सॉलिड स्टेट ड्राईव्ह, आपण याला SSD असेही म्हणतो. Solid State Drive बनवण्याचा मुख्य उद्देश संगणकाला वेगवान बनवण्याचा आहे. आजच्या या लेखामध्ये आपण Solid State Drive ची माहिती म्हणजेच, Solid State Drive in Marathi पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता मुख्य माहितीकडे वळूयात.
सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) म्हणजे काय? – What is Solid State Drive in Marathi?
सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive in Marathi) हे नवीन पिढीतले Computer Storage Device आहे. Computer मधील डेटा Store करण्यासाठी हे उपकरण बनवण्यात आलेले आहे. लोकप्रिय असलेले Storage Device, हार्ड डिस्कला हे पर्यायी उपकरण आहे. हार्ड डिस्क च्या ऐवजी सॉलिड स्टेट ड्राईव्ह वापरल्याने संगणकाचा Operate करण्याचा वेग वाढतो, कारण HDD च्या तुलनेने SSD चा Read and Write Time खूप कमी असतो. संगणकाचा Operate वेग जास्त असल्याने वापरकर्त्यांना कमी वेळेत डेटा मिळवता येतो.
डेटा स्टोर करण्यासाठी Solid State Drive मध्ये NAND Flash Memory System वापरण्यात आलेली आहे. NAND Flash Memory ही एक चिप असते, यामध्ये डेटा Store होत असतो. SSD ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आहे, यात कोणतेही Moving Part वापरण्यात आलेले नाहीत, यामुळे SSD चा Read and Write Time कमी असतो व कमी वीजेत सुद्धा SSD योग्यरीत्या कार्य करते.
0 Comments